‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अवॉर्डची घोषणा; लाखोंची बक्षिसे

Spread the love

प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन- सकारात्मक पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे एक पाऊल

मुंबई

पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पॉझिटिव्ह जर्नालिझमसाठी पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. २०२३ पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी केले आहे. पत्रकारांसाठी चांगले करण्याच्या उद्देशाने राज्यातील 20 संपादकांनी एकत्रित येऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची निर्मिती झाली आहे. आज जगभरात चाळीस हजारांपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ही एकमेव संघटना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही २१ देशांपर्यंत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही पत्रकारांची संघटना पोहोचली आहे. या संघटनेने पत्रकारांच्या पंचसूत्रीसह इतर समस्यांसोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठीही पुढाकार घेतला आहे. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ व मानपत्र असा आहे, तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ६१ हजार रुपये, महिला पत्रकारांसाठी ५१ हजार रुपये व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ४१ हजार रुपये रोख, तसेच स्मृतिचिन्ह, ग्रंथ व सन्मानपत्र असे आहे. या पाच प्रकारांमध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे. सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी दैनिक व साप्ताहिकाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडावे. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र व मराठी भाषेपूर्तीच मर्यादित आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्य पदाधिकारी मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल म्हस्के, विलास बढे, सुधीर चेके पाटील व बालाजी मारगुडे हे निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. पत्रकारांनी आपले प्रस्ताव थेट ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय, एल. ३०-१२०१ स्वप्नपूर्ती, सेक्टर- ३६, खारघर, नवी मुंबई या पत्त्यावर पाठवायचे आहेत. व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रमुख पदाधिकारी यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही.
पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३, प्रथम क्रमांक- १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान. द्वितीय क्रमांक ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ,सन्मान.
महिला विभाग ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ महिला विभाग, ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सकारात्मकता पुरस्कार,तृतीय क्रमांक- ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान असे स्वरूप पुरस्कारांचे आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व शेठ ब्रिज मोहन लड्डा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रस्ताव पाठवण्याचे आवहान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!