धाराशिव मध्ये पत्रकारांच्या अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्डचे होणार वाटप

Spread the love

धाराशिव

व्हॉईस ऑफ मीडिया या जागतिक पत्रकार संघटनेच्यावतीने धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक ३ मार्च रोजी करण्यात आले आहे.

 धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत कार्ड योजना वाटप करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाने गेल्या वर्षापासून प्रारंभ केला आहे. गतवर्षी या योजने अंतर्गत जिल्ह्यातील २५० पत्रकारांचा अपघात विमा उतरविण्यात आला होता. त्याची मुदत संपली असून यावर्षी या अपघात विमा बरोबरच आयुष्यमान भारत कार्डचे देखील वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार कैलास पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व व्हाईस ऑफ मीडियाच्या दिव्या भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.  हा कार्यक्रम धाराशिव शहरातील सांजा रोडवरील बीएसएनएल ऑफिस समोरील आर्यन फंक्शन हॉलमध्ये सकाळी ९ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाईस ऑफ मिडियाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!