राशी खोत हिने वक्तृत्व स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

Spread the love

सुबोध विद्यामंदिर तेरखेडा येथे शाळेत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

वाशी

शिवजयंती निमित्त तेरखेडा येथे राज्यस्तरीय अंतरशाला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मोठ्या गटातून सुबोध विद्यालयातील इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या कु.राशी हनुमंत खोत या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवला.स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे राशी हीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून परीक्षक गाडेकर विनोद, सागर गडगडे, माधुरी घोलप यांनी पाहिले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिंदे दत्तप्रसाद ज्ञानोबा (स.शि.सुबोध विद्यामंदिर तेरखेडा) यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन बालाजी वाघमारे, विलास भारते, अच्युत शिंदे, दत्तप्रसाद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक पारवे सर सहशिक्षक दत्तप्रसाद शिंदे, कुलवकर सर, शिंगाडे सर, शिंदे सर,मुळे सर, पांढरे सर, सोनवणे सर, जाधव मॅडम, अक्षय घोलप, योगेश भापकर यांसह कर्मचारी वर्ग विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!