पत्रकारांच्या १० वी व १२ वी व नीटमधील गुणवंत पाल्ल्यांचा गुणगौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन

Spread the love

पत्रकारांनी आपल्या पाल्ल्यांची नोंदणी अवश्य करावी नोंदणीसाठी आजची शेवटची संधी

धाराशिव

धाराशिव तालुक्यातील पत्रकारांच्या १० व १२ वी व नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या सर्व गुणवंत पाल्य व त्यांच्या पालकांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुक्याच्यावतीने २० जून रोजी करण्यात येणार आहे.

पत्रकार हा समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांचे आपल्या लेखणीतून कौतुक करतात. मात्र पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा ते सत्कार करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्यासह प्रेरणा देण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,

नाव नोंदणी दि.१५ जूनपर्यंत तालुक्यातील पत्रकारांनी आपल्या १० वी व १२ वी व नीट उत्तीर्ण पाल्याचे नाव नोंदणी तालुकाध्यक्ष अमजद सय्यद संपर्क क्रमांक 8390088786 कीवा 9850063001 यांच्याकडे करावी. हा गुणगौरव सत्कार सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील अधिकारी व उद्योजक आदी मान्यवर हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे धाराशिव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचे नाव तात्काळ व्हाईस ऑफ मीडियाकडे कळवावीत. विशेष म्हणजे व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने हा पत्रकारांच्या पाल्यांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला असल्यामुळे जास्तीत जास्त पत्रकारांनी आपल्या पाल्यांसह सहकुटुंब उपस्थित रहावे. असे आवाहन व्हॉईस मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!