जि.प.प्रा शाळा खोंदला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

कळंब

दिनांक 02/10/2023 रोजी जि प प्रा शाळा खोंदला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री डांगरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री कस्पटे सर यांनी दोन्ही नेत्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी स्वछतेची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती शिक्षिका शेळके मॅडम यांनी परिश्रम घेतले, याप्रसंगी शाळेतील उपक्रमशील शिक्षक जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व शिक्षक श्री जगताप सर, श्री बोरकर सर, श्रीम. शेळके मॅडम , आशा कार्यकर्त्या बबीताताई लांडगे,दोन्ही अंगणवाडी कार्यकर्त्या श्रीमती . पवार ताई व लांडगे ताई उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!