व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी अकिब पटेल यांची नियुक्ती

Spread the love

कळंब

राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष पदी अकिब पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व डिजिटल मीडिया विभाग राज्याध्यक्ष जयपाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली.

पटेल यांची निवड झाल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विविध शिबिर आणि प्रशिक्षण मेळावे आयोजित करून जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षित करू, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे.

अकिब पटेल यांची निवड झाल्याबद्दल, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्याध्यक्ष जयपाल गायकवाड, प्रदेश सरचिटणीस के. अभिजीत, कोअर टीमचे चेतन कात्रे,हुंकार बनसोडे मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, डिजीटल विभागाचे जिल्हा अध्यक्ष वैभव पारवे यांनी त्यांचे अभिनंदन करत नियुक्तीचे पत्र पाठवण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यातील डिजिटल मीडिया विभागाची कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार असून या संघटनेशी जुळून कार्य करण्याकरिता 9552 416181 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!