“होऊ द्या चर्चा” करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड या अभियानाचा शुभारंभ

Spread the love

धाराशिव – आज धाराशिव तालुक्यातील राजुरी(ये.) येथे आई येमाई देवीच्या चरणी श्रीफळ अर्पण करून “होऊ द्या चर्चा” करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड या अभियानाचा शुभारंभ आ कैलास पाटील ,संपर्कप्रमुख श्री. दत्ता नाना गायकवाड, सहसंपर्कप्रमुख मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.2014 साली मोदी सरकारने सत्तेत येताना रोजगार, महागाई, अर्थव्यवस्था, पेट्रोल डिझेलचे भाव, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख, काळे धन परत आणू यासारखी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट स्वतः ची प्रतिमा उंचावणे, प्रत्येक ठिकाणी भाजप सत्तेत कशी येईल यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला. नोटबंदीसारखा निर्णय घेऊन भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आणली असल्याचे आ पाटील यांनी म्हटले . प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या योजनेला बुड ना शेंडा राहिला आहे. या बोलघेवड्या सरकारचा आणि त्यांच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.भाजप प्रणित मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेची विविध मार्गाने केलेली फसवणूक जनतेपर्यंत पोचवण्याच्या कार्याची मा.पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सुरुवात करून आज धाराशिव तालुक्यातील राजुरी (ये.) व सारोळा (बु.) येथे होऊ द्या चर्चा या अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांशी चर्चा केली.

देशात लोकशाही टिकवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने लोकशाहीच्या विकासासाठी सजग राहणं आवश्यक असल्याचं मत यावेळी आ कैलास पाटील यांनी व्यक्त केले.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, अंकुश मोरे, राज जाधव, अविनाश इंगळे, गफूर शेख,विनोद बाकले, धनंजय इंगळे, राकेश सुर्यवंशी, गुरुनाथ गवळी, विकास जाधव, सरपंच मधूकर गळकाटे, अनिल भोसले, गणेश जाधव, सुरेश कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष अकबर शेख, सावन देवगिरे, आदींसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!