धाराशिव – राज्यभरात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने देशभरात शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाच्या राज्यप्रमुख तथा व्हॉईस ऑफ मीडिया राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुलाखती घेऊन पाच जणांची प्रत्येकी दोन तालुके याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यासह तालुक्यामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाने मोठे काम उभे केले आहे आंतरराष्ट्रीय वाटचालीमध्ये पुढाकार घेत व्हॉईस ऑफ मीडिया आज 19 देशांमध्ये पोहचल्याचे सांगितले व देशात 38 हजार पत्रकार सदस्य काम करत आहेत असे शैक्षणिक कक्षाचे राज्यप्रमुख चेतन कात्रे यांनी बैठकीत सांगितले त्यांनी पाच जणांच्या मुलाखती घेऊन धाराशिव जिल्ह्यासाठी तालुका निहाय शैक्षणिक विभागाचे काम करण्यासाठी खालील पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या आहेत यामध्ये विशाल खामकर (भूम,परांडा), रामराजे जगताप (कळंब,वाशी), शितलजी वाघमारे (लोहारा,उमरगा),आमीन खतिब (धाराशिव), किरण कांबळे (तुळजापूर) या तालुका निहाय पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री.हुंकार बनसोडे व इतर व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते व त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.