धाराशिव
पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मिडिया कळंब शाखेच्या वतीने पत्रकार व विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा कळंब येथील वेद शैक्षणिक संकुल येथे पार पडला.यामध्ये राजकीय कट्टा या सोशल मीडिया वृत्तवाहिनीचे संपादक तथा भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांचा देखील पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल श्री सिद्धिविनायक परिवाराचे प्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहेकर मल्टीस्टेट व ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन हनुमंत मडके हे होते तर यावेळी व्यासपीठावर कळंबचे पोलीस उपाधिक्षक संजय पवार,अन्नदाते बंडोपंत दशरथ,व्हाईस ऑफ मिडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित दादा कुंकूलोळ, सरचिटणीस चेतन कात्रे,जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,आरोग्यदूत डॉ.रमेश जाधवर, प्राचार्य डॉ.साजिद चाऊस,दैनिक एकमत तालुका प्रतिनिधी सतीश टोणगे,दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी परमेश्वर पालकर, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विलास मुळीक,कळंब तालुका पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे,कळंब पोलीस स्थानकाचे श्री कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी कळंब तालुक्यातील पत्रकारिता सामाजिक क्षेत्र उद्योग वैद्यकीय व्यवसाय या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ही गुणगौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मिडियाचे मराठवाडा कार्याध्यक्ष अमर चोंदे व जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत मडके व तालुकाध्यक्ष रणजीत गवळी यांच्यासह व्हाईस ऑफ मिडिया कळंब शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.