धाराशिव
भारतभर नाव लौकीक मिळवून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये सामील झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष पदी गोविंद खुरूद यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाने गोविंद खुरुद यांची निवड दि 7 जानेवारी रोजी करण्यात आली. व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या सहीने नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी डिजिटल विंग चे धाराशिव जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, प्रसिध्दी प्रमुख किशोर माळी, युवापत्रकार खुरुद यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.