मराठा आरक्षणाची धग धाराशिव जिल्ह्यात पसरली!

Spread the love


कसबे तडवळे

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी रविवारपासून कसबे तडवळे येथील उपसरपंच प्रताप करंजकर गणेश करंजकर हेअमरण उपोषणाला बसले तत्पूर्वीमराठा बांधवांच्या वतीनेविविध घोषणा देतगावामधून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील ढोकी गावातून मराठा बांधवांनी पदयात्रा काढली. यानंतर लातूर मार्ग रोखून ९ जणांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोवर मागे हटणार नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून दिवसागणिक पाठिंबा वाढत असूनयाचाच एक भाग म्हणून येथील उपसरपंच प्रताप करंजकर गणेश करंजकर यांनी उपोषण करून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार रविवारी सकाळी दहा वाजता त्यांनी गावातील सर्वमराठा बांधवांना एकत्र करून गावामधून रॅली काढली व छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये अमरण उपोषणाला सुरुवात केली . यावेळी माजी उपसरपंच विजयसिंह जमाले, शहाजी वाघ, तुळशीदास जमाले, उद्योगपती देवदत्त मोरे माजी उपसभापती सुधीर करंजकर, विशाल जमाले दिलीप करंजकर, डॉ. धनंजय करंजकर किशोर कदम सुदर्शन करंजकर गणेश करंजकर बुवा धनके यांच्या प्रमुख उपस्थिती सह दुधगाव, खामगाव, कोंबरवाडी, गोपाळवाडी, जवळा, रुई या गावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गावामध्ये उपोषणाला बसलेले उपसरपंच प्रताप करंजकर , गणेश करंजकर यांना पाठिंबा देण्यासाठी गावातील मुस्लिम बांधव पुढे सरसावले असून मुस्लिम बांधवांच्या वतीने उपसरपंच करंजकर यांचा जाहीर सत्कार करून मुस्लिम बांधवांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला .यावेळी माजी उपसरपंच सुरज पाशा कोतवाल रोप कोरबू अब्दुल रहमान तांबोळी शकील कोतवाल समद कोरबू हसन कोरबू तसलीम कोतवाल जाकीर मुजावर एकबाल फकीर हर्षद कोरबु यांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!