• जिल्ह्यातील खताचे आजअखेर एक लाख 8 हजार 48 मे.टन आवंटन
• पेरणीसाठी बियाणांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध
धाराशिव
खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अर्ज घेणे सुरु आहे. आत्तापर्यंत 4 लाख 14 हजार 312 अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. चालू खरीप हंगामात पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 31 जुलै 2023 आहे.
पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील मिळून 3 लाख 33 हजार 227 हे.क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. भूम तालुका 60 हजार 619, कळंब तालुका 63 हजार 285, लोहारा तालुका 23 हजार 269, उस्मानाबाद तालुका 70 हजार 455, परंडा तालुका 35 हजार 730, तुळजापूर तालुका 63 हजार 201, उमरगा तालुका 54 हजार 108 आणि वाशी तालुक्यातील 43 हजार 647 असे एकूण 4 लाख 14 हजार 309 शेतकऱ्यांनी पीक विमा भरुन पीक संरक्षित केले आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकूण पीक विमा हिश्श्यापैकी आत्तापर्यंत राज्याचा हिस्सा 189 कोटी 12 लाख 51 हजार 663 रुपये असून केंद्र शासनाचा एकूण हिस्सा 154 कोटी 63 लाख 81 हजार 232 रुपये जमा करण्यात आला आहे. असे राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा रक्कम 343 कोटी 80 लाख 47 हजार 203 रुपयांचे विमा रक्कम प्राप्त झाली असून एकूण एक हजार 716 कोटी 47 लाख 75 हजार 675 रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खताचे 1 एप्रिल ते जुलै 2023 अखेर आयुक्तालयाकडील मंजूर आवंटन 55 हजार 369 मे.टन असूनसुध्दा 61 हजार 23 मे.टन खत आवंटन प्राप्त आहे. तसेच मागील मार्च 2023 अखेरची शिल्लक 47 हजार 25 मे.टन आहे. असे आज अखेर खत उपलब्धता एकूण एक लाख 8 हजार 48 मे.टन आहे.
जिल्ह्यात खरीपासाठी सोयाबीन बियाणे 69 हजार 679 क्विंटल पुरवठा झाला असून त्यापैकी 53 हजार 270 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. तूर बियाणे 3 हजार 33 क्विंटल पुरवठा झाला असून एक हजार 248 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. मुग बियाणे एक हजार 753 क्विंटल पुरवठा झाला असून 588 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. उडीद बियाणे 3 हजार 11 क्विंटल पुरवठा झाला असून त्यापैकी एक हजार 147 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. कापूस बियाणे 8 हजार 33 क्विंटल पुरवठा झाला असून एक हजार 282 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. मका बियाणे 2 हजार 890 क्विंटल पुरवठा झाला असून 893 क्विंटल बियाणाची विक्री झाली आहे.