लंपट सोमय्याच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी हाणले जोडे

Spread the love

धाराशिव


माहिती अधिकार फेम भाजप नेता किरीट सोमय्या याचे लंपट चाळे करणारी व्हीडीओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. माहिती अधिकारच्या नावाखाली इतर पक्षातील लोकांना ब्लॅकमेल करून अय्याशी करणार्‍या किरीट सोमय्याचे काळे कारनामे उघड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्याच्या प्रतिमेला जोडे हाणून आंदोलन करण्यात आले. यापुढे किरीट सोमय्या कुठेही दिसल्यास त्याला बदडून महाराष्ट्राबाहेर हाकलण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला.

भाजपाचा कथित नेता किरीट सोमय्या याचे अश्लील चाळे करणारे व्हीडीओ प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशिष्ट पक्षातील लोकांना उघडे करण्याची भाषा करत स्वतःच नागड्या झालेल्या सोमय्याच्या प्रतिमेला मंगळवारी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे हाणण्यात आले. यापुढे महाराष्ट्रात कुठेही सोमय्या दिसल्यास त्याला जोडे हाणून महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

या आंदोलनात शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, सौ.सुगुणा आचार्य, धाराशिव तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, नितीन शेरखाने, राणा बनसोडे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, नाना घाटगे, सतीश लोंढे, हनुमंत देवकते, प्रभाकर राजे, सुनील वाघ, राजदीप गायकवाड, पिंटू आंबेकर, शिवराज आचार्य, लाला पवार, पंकज पडवळ, सौ.शैला कोकाटे, लता आगळे, विमल शिंदे, मनीषा लोंढे, लता गायकवाड, सुरेखा शिंदे, कोंडाबाई जगदाळे, सौ.पूजा आचार्य, शांताबाई मुंडे, पार्वती सोनवणे, सौ.मंगल लावंडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!