वाशी – बारामती येथे 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात काही कारणास्तव जे पदाधिकारी व सदस्य हजर राहू शकले नाहीत किंवा ज्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन हजेरी दर्शवून आपला विक्रम नोंदवला त्यांच्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय संदीपजी काळे सर यांच्या सूचनेनुसार कळंब येथे 29 नोव्हेंबर रोजी बैठक व भोजनाचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा शिक्षण विभाग प्रमुख चेतनजी कात्रे,महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य सयाजी शेळके, मराठवाडा उपविभागीय अध्यक्ष अमरजी चोंदे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष हुंकारजी बनसोडे,धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष रहीमजी शेख,यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आला. या वेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी सध्या वर्तमानपत्रापेक्षा सामाजिक माध्यमावर जास्त भर असल्यामुळे पत्रकारांनी वास्तविकेचे भान ठेवून लिखाण करावे असे म्हणाले. तसेच महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य सयाजी शेळके, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागाचे प्रमुख चेतनजी कात्रे, व्हाईस ऑफ मीडियाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकारजी बनसोडे, दै. धाराशिव नामाचे मुख्य संपादक विनोदजी बाकले, धाराशिव कार्यध्यक्ष अध्यक्ष रहिम शेख या प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणातून पत्रकारांचे आरोग्य,घरे, पत्रकावर होणारे हल्ले, पत्रकाराच्या पाल्यांचे शिक्षण या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच स्नेहभोजनासाठी नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, धाराशिव स्थानीक गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, कळंब पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक गजानन पाटिल, सहायक पोलिस निरीक्षक हणुमंत कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक कल्याण नेहरकर व इतर कर्मचारी यांनी व्हाईस ऑफ मिडियाच्या पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून स्नेहभोजनाचा स्वाद घेतला. व त्यांचा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमांमध्ये व्हॉइस ऑफ मिडिया कळंब तालुका साप्ताहिक विंगची कार्यकारणी जाहीर करण्यात आली तालुका उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र (भाऊ) बारगुले आणि महेश फाटक, तालुका कार्याध्यक्ष जयनारायण दरक, तालुका सचिव कुंदन कांबळे व तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून परमेश्वर खडबडे तसेच धाराशिव जिल्ह्याचे डिजिटल विंगचे कार्याध्यक्ष म्हणून अकिब पटेल यांची निवड करण्यात येऊन नियुक्त पत्र देण्यात आले. व त्यांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजीटल विंगचे चे जिल्हाध्यक्ष व वाशी तालुकाध्यक्ष वैभव पारवे,दै. धाराशिव नामा चे संपादक विनोद बकले, धाराशिव नामाचे जिल्हा प्रतिनिधी सचिन वाघमारे, राजकीय कट्टाचे मुख्य संपादक प्रा.सतीश मातने, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, आयबीएन लोकमत चे जिल्हा प्रतिनिधी बालाजी निरफळ, दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी शितल कुमार धोंगडे, तालुका उपाध्यक्ष श्रीकांत मडके, रामराजे जगताप, कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, तालुका प्रसिद्धी प्रमुख दीपक माळी,सचिव महेश मिटकरी,साप्ताहिक विंगचे तालुकाध्यक्ष प्रा. अविनाश घोडके,वाशी तालुका कार्याध्यक्ष विलास गपाट,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, प्रेस फोटो ग्राफर विशाल खामकर, शिवप्रसाद बियाणी, आश्रुबा कोठावळे, सतीश तवले, अशोक कुलकर्णी, सिकंदर पठाण, शोएब काझी,दत्ता भराटे,सचिन कोरडे,विश्वनाथ जगदाळे,समाधान जाधव, राहुल गाडे, दादा खतीब, अविनाश सावंत तसेच कळंब व वाशी तालुक्यातील इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.