धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची डिसेंबर – २०२५ मधील नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी करावी. असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगणा आणि इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक कुलाचार व कुलधर्मासाठी तुळजापूरला येतात.श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत श्रद्धेने केली जाणारी पूजा असून,नोंदणीसाठी http://shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर ‘सिंहासन पूजा पास बुकिंग’ या मेन्यूवर क्लिक करून, https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर जाऊन नोंदणी करावी
नोंदणीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे
नोंदणी कालावधी : २० नोव्हेंबर २०२५ सकाळी १० वाजता ते २५ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपर्यंत. प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट : २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.भाविकांनी प्रथम फेरीचे ऑनलाईन पेमेंट २७ नोव्हेंबर सकाळी ११ ते २८ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपर्यंत करावे. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एसएमएस पाठविण्यात येईल. व्दितीय फेरीचे ऑनलाईन पेमेंट २८ नोव्हेंबर सकाळी ११ ते २९ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल.तृतीय सोडत व भाविकांना एसएमएस २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापर्यंत पाठविण्यात येईल.तृतीय फेरीचे ऑनलाईन पेमेंट २९ नोव्हेंबर सकाळी ११ ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. डिसेंबर २०२५ या महिन्यातील अंतीम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. वरीलप्रमाणे सर्व भाविक भक्त, महंत,पुजारी,सेवेकरी आणि नागरिकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पूजेच्या नोंदणीची माहिती लक्षात घेऊन वेळेत नोंदणी करावी,दिनांक २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री देवीजींची मंचकी निद्रा असल्याने तसेच २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्य यजमान,तिन्ही पुजारी मंडळ व महंत यांचेसाठी सिंहासन पूजा आरक्षित असल्याने या कालावधीत सिंहासन पूजा होणार नाही.याची भाविकांनी नोंद घ्यावी.असे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी कळविले आहे.











