धाराशिव – धाराशिव जिल्हयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली शहरी व ग्रामीण भागातील लोड शेडींग बंद करुन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने कमीत कमी 8 तास विज पुरवठा करण्याची मागणी करत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले
धाराशिव जिल्हयामध्ये मागील वर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक उन्हाळी पिकांची लागवड केलेली असुन विजे अभावी त्यांची पिके वाळुन जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसानही होत असुन शेतकऱ्यांना 8 तास सुरुळीत वीज मिळत नाही व जो वीज पुरवठा करण्यात येतो तोही कमी दाबाने पुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोटारी नादुरुस्त होणे, वारंवार ट्रान्सफार्मर जळणे अशा गोष्टी घडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे. यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आपले कार्यालयाकडुन जी लोड शेडिंग चालू केली आहे ती बंद करण्यात यावी विशेषतः ग्रामीण भागा मध्ये सकाळी 6 ते 8 या वेळे मध्ये ज्यावेळी दूध उत्पादक शेतकरी त्याचे गोठ्या तील कामे करत असतो, शाळेत जाणारे विद्यार्थी अवरत असतात, गृहिणी घरची कामे , स्वयंपाक करत असते या सर्वांना आपल्या वीज पुरवठा खंडित केल्याने विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सध्या परिक्षेचे दिवस असल्यामुळे व रात्री सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासापासुन वंचित रहात लागत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच काही गावांमध्ये संध्याकाळी शेतातील सिंगल फेज वीज पुरवठा 6-10 या काळा मध्ये बंद असतो, बऱ्याच गावामध्ये शेतकरी शेतामध्ये वास्तव्यास असल्यामुळे व शेतात जनावराचे गोठे असल्याने त्यांना या वेळेत वीज नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे.
तरी शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने कमीत कमी 8 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा व रात्रीची लोडशेडींग बंद करुन शेतकऱ्यांचे जळालेले ट्रान्सफार्मस तात्काळ त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत. या बाबत तात्काळ योग्य ती सुधारणा न केल्यास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे व शेतकऱ्या तर्फे महावितरण कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, सोमनाथ गुरव शहर प्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, जिल्हा प्रवक्ते जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप घेणे, विठ्ठल सातपुते, पंचायत समिती सदस्य राजदिप गायकवाड, आदित्य पवार,विधानसभा संघटक शैकत शेख, नगरसेवक ज्ञानदेव करवर, पंकज पाटील, अमित उंबरे, मा. नगरसेवक राणा बनसोडे, संभाजी सलगर, सिध्देश्वर कोळी, युवासेना तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी, युवासेना शहर प्रमुख अभिजीत कदम, युवासेना संघटक कृष्णा मुंडे, वाहतुक सेनेचे अध्यक्ष सुनिल वाघ, उपतालुका प्रमुख लखन देशमुख, उपतालुका प्रमुख जगदिश शिंदे, सौदागर जगताप, विकास जाधव, दत्ता पाटील, गोविंद गरड, बाळासाहेब पाटील, पांडूरंग पाटील, विभाग प्रमुख- अमोल मुळे, गजानन नलावडे, सत्यजित पडवळ, आकाश पाटील, आबा सारडे, ओंकार सारडे, बालाजी जाधव, पांडूरंग माळी, दिनेश हेड्डा, सावन देवगीरे, भारत पवार, समाधान जाधव, विकास जाधव, कृष्णा जाधव, वैभव घोडके, बाळासाहेब सुर्यवंशी, बबलू जाधव, आनंत सुर्यवंशी, गौरव पाटील, तुषार कदम, कृष्णा अंगरकर, रोहन पाटील, सुनिल गरड, अमित उंबरे, मनोज उंबरे, ओंकार नायगांवकर, सतिश लोंढे, कलीम कुरेशी, बिलाल कुरेशी, अक्षय खळदकर, सह्याद्री राजेनिंबाळकर, राकेश कचरे, पंकज स्वामी, प्रविण केसकर, सुनिल गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.










