वाशी
कळंब व वाशी व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने कळंब येथे फराळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती येथे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात काही कारणास्तव जे हजर राहू शकले नाहीत किंवा ज्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन हजेरी दर्शवून आपला विक्रम नोंदवला, त्यांच्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय संदीपजी काळे यांच्या सूचनेनुसार कळंब येथे २९ नोव्हेंबर रोजी फराळ- भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा शिक्षण विभाग प्रमुख चेतन कात्रे, महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य सयाजी शेळके, मराठवाडा उपविभागीय अध्यक्ष अमर चोंदे, धाराशिव जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य हुंकार बनसोडे, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख ,यांची उपस्थिती लाभणार आहे .व्हॉईस ऑफ मीडियाच्या कळंब-वाशी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी ह्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कळंब तालुका व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष रंजीत गवळी वाशी तालुकाध्यक्ष वैभव पारवे,कळंब तालुका कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, वाशी तालुका कार्याध्यक्ष विलास गपाट, वाशी तालुका उपाध्यक्ष शहाजी चेडे, शिवाजी गवारे, श्रीकांत मडके, रामराजे जगताप, महेश मिटकरी, दीपक माळी यांनी केले आहे.