धाराशिव
शिवसेना व धाराशिव फाउंडेशनच्या वतीने धाराशिव शहरात आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवाचा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ केला.
या नोकरी महोत्सवात ५२१८ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. तसेच काही ऑफलाईन नोंदणी साठीही उमेदवार आलेले होते. त्यातील ९३० उमेदवारांना लागलीच नोकऱ्यांचा लाभ देण्यात आला. ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांना जॉब कार्डचे वितरण करण्यात आले आहे. जॉब कार्डमुळे उमेदवारांना कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पदाची व कंपनीतील जाहिरातीची माहिती मेसेजद्वारे मोबाईलवर मिळणार आहे.
आज सकाळपासूनच बेरोजगार युवकांची तुफान गर्दी होती, ही गर्दी लक्षात घेता, यापुढेही असेच नोकरी महोत्सव घेण्याचा निर्धार केला. पुढील काळात शहरासह जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये मोठ्या कंपन्या आणून जिल्ह्यातील बेरोजगारी हटविण्याची प्रयत्नशील राहू, असा शब्द दिला.
अतिशय शिस्तबद्ध व सुनियोजित व्यवस्थेत राज्यातील सुमारे ३५ कंपन्यांनी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, मुलाखती व नोकरी आदेशाची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, जॉब फेयर इंडियाच्या तास्मिया शेख, युवतीसेना सचिव तथा विस्तारक मनीषा वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नितीन शेरखाने, विक्रम पाटील, विभागीय सचिव तथा जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, राणा बनसोडे, पंकज पाटील, अभिजित देशमुख, सुमित बागल, धनंजय इंगळे, मुकेश पाटील, सौदागर जगताप, आकाश मुगळे, विश्वजीत जाधव, मनोहर धोंगडे, वैभव वीर, राकेश सूर्यवंशी, राज जाधव, प्रशांत जगताप, संजय भोरे, पांडुरंग माने, रवी कोरे, संजय खडके, बंडू आदरकर, निलेश शिंदे, पृथ्वीराज देडे, बापु साळुंखे, ओंकार आगळे, राज निकम, मुजीब काझी, अफ्रोज भाई पिरजादे, साबेर सय्यद, नरसिंग आंबेकर, साजिद भाई, गफूर भाई शेख, आदित्य पांचाळ, अतिक सय्यद, सत्यजित पडवळ, महेश लिमये, अजित बाकले, रोहित कदम, रुपेश शेटे तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.