• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

admin by admin
December 11, 2025
in अर्थव्यवस्था, महाराष्ट्र, राजकीय, शहरी, संपादकीय
0
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा
0
SHARES
2
VIEWS

आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी

धाराशिव – शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा ही जवळपास दोन वर्षे रेंगाळलेल्या निविदा प्रक्रियेमुळे झाली असून त्याची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत केली आहे. नागपूर मुक्कामी सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही मागणी केली आहे. शहरातील आठवडी बाजार, सार्वजनिक उद्याने, पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पुरवण्या मागण्यांच्यावेळी आपली पुरवणी मागणी मांडताना आमदार पाटलांनी हे प्रश्न मांडले अध्यक्षस्थानी तालिकाध्यक्ष चैनसुख संचेती होते. बावीस महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०२४मध्ये नगरविकास मंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र निविदा प्रक्रिया आणि स्थगितीच्या फेऱ्यात हा निधी अडकल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याचे दुष्परिणाम या रस्त्यावरून वावरणाऱ्या शहरातील नागरिकांना भोगावे लागत आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. नगरविकास खात्याच्या गोविंदाराज यांनी झालेल्या दोन चौकशीचे निर्णय दोन्ही वेळी वेगवेगळे दिले. एका बाजूला आपण गतिशील महाराष्ट्र आता थांबणार नाही असे म्हणत असताना एका निविदा प्रक्रियेला बावीस महिने का थांबली, कुणामुळे थांबली. याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि या कामांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन कामांना लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे अशी रोखठोक मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी नगरविकास मंत्री सभागृहात उपस्थित होते.

शहरातील उद्यानांसाठी व आठवडी बाजारासाठी मागच्या काळात निधी मंजूर झाला. त्याला स्थगिती दिली गेली. उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने स्थगिती उठविण्याचे सांगण्यात आले. सद्य परिस्थितीत शहरात एकही उद्यान नाही. आठवडी बाजार भरणारे धाराशिव शहर हे एकमेव जिल्ह्याचे ठिकाण आहे. असे असताना त्यास स्थगिती देण्यात आली आहे. नगरविकास मंत्र्यांनी उच्च न्यायायचा मान राखून उत्तरात ही स्थगिती उठविण्याचे सूतोवाच करावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Follow us on social media:

१५व्या वित्त अयोगातून नगरपालिकांनी मिळणारा निधी खूप कमी झाला आहे. पूर्वी धाराशिव नगरपालिकेला १५ कोटींचा वित्त आयोगाचा निधी मिळत असे. आता मात्र तीन ते चार कोटींचा निधी मिळत आहे. परिणामी घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि दिवाबत्तीचा खर्च यावर विपरीत परिणाम होऊन सर्व यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यावर पूर्वीप्रमाणेच नगरपालिकेला वित्त आयोगाचा निधी मिळावा. मागील वर्षात वित्त आयोगाच्या निधीचा एकही हप्ता नगरपालिकेला मिळालेला नाही. परिणामी नगरपालिकेची आर्थिक कोंडी होऊन या कामावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. ही कामे व्यवस्थित मार्गी लागण्यासाठी निधीची तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

शहरातील कचरा डेपो आता शहराच्या मध्यवस्तीत आलेला आहे. शहरात कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. याचे दुष्परिणाम लोकांना भोगावे लागत आहेत. काहींना श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, हा कचरा नष्ट करावा आणि कचरा डेपो शहराबाहेर हलवावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

तेर, ढोकी, कसबे तडवळा आणि येडशी या चार गावांना एक संयुक्त पाणीपुरवठा योजना आहे. मात्र त्याचा वीजपुरवठा खंडित केला असल्याने ही योजना सध्या बंद आहे. या योजनेसाठी जवळपास सव्वा कोटी खर्चून सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र वीज देयकाअभावी व नीट मिटरिंग प्रणालीमुळे ही योजना ठप्प झालेली आहे. ही योजना चालू करण्यासाठी हप्त्याहप्त्याने वीज देयक अदा करण्याची परवानगी द्यावी. या योजनेला विद्युत पुरवठा करावा. ज्यामुळे या चार गावातील जवळपास पन्नास हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा योजनेचा लाभ घेता येईल. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

Next Post

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Related Posts

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
अर्थव्यवस्था

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

December 24, 2025
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
ग्रामीण

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025
Next Post
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

ताज्या घडामोडी

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!