• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

admin by admin
December 24, 2025
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
0
SHARES
22
VIEWS

सेरेंटीकाच्या वतीने शेतकर्‍यांसाठी मोफत हेल्पलाईनचे उद्घाटन

धाराशिव – धाराशिव जिल्ह्याची आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्याची ही ओळख बदलण्यासाठी या भागाच्या आर्थिक विकासासाठी सेरेंटीका कंपनी काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.

सेरेंटीका कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील ४० दिव्यांगाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सेरेंटीका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रेसीडेंट सुरजीत नारायण, कर्नल विक्रम अय्यंगार, अमित चक्रोबोर्ती आदीची उपस्थिती होती.

Follow us on social media:

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की, सेरेंटीका कंपनी जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींना व्हिलचेअरचे वाटप करत आहे, तसेच जिल्ह्यातील दिव्यांगाना मदत करण्याची कंपनीची इच्छा आहे, ही मोठी गोष्ट आहे. जिल्ह्यातील विविध घटकांसाठी सेरेंटीका कंपनी काम करत आहे. युवक – युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम कंपनीच्या वतीने करण्यात येत असून हे कौशल्य प्रशिक्षण पुर्ण झालेल्या काही युवकांना नौकरी देण्याचे कामही कंपनीने केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनीही रोजगारक्षम व्हावे यासाठी कौशल्य प्रशिक्षण कंपनीच्या वतीने देण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सेरेंटिका कंपनीच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध समाजपयोगी कामाची दखल घेवून कंपनीच्या वतीने करण्यात येणार्‍या या समाजपयोगी कामाचे कौतूकही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी केले.

सेरेंटीका कंपनीच्या वतीने शेतकर्‍यांठी हेल्पलाईन
जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते उद्घाटन

सेरेंटीका कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्प उभारताना शेतकर्‍यांचे पवनचक्की संबंधित समस्या सोडविण्यासाठी एक मोफत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. १८०० २०२ ८७३५ हा कंपनीचा हेल्पलाईन नंबर असून याद्वारे शेतकर्‍यांना कंपनीच्या प्रतिनिधीशी थेट संवाद साधता येणार आहे. सदर हेल्पलाईन हि फक्त सेरेंटिकाच्या पवनऊर्जा प्रकल्प लाभार्थी शेतकर्‍यांसाठी असणार आहे. या हेल्पलाईनद्वारे सेरेन्टिका पवनचक्की संबंधित जमीन, वाटेचा वापर, नुकसान भरपाई, वाजवी मोबदला आणि इतर संबंधित समस्यासाठी शेतकर्‍यांना कंपनी बरोबर थेट संवाद साधता येणार आहे. शेतकर्‍यांना पवनचक्की प्रकल्पासंदर्भात असलेल्या शंकांचे निवारण होण्यास या हेल्पलाईनची मदत होणार आहे. सेरेन्टिका रिन्यूएबल्सच्या अधिकार्‍यांकडून या हेल्पलाईनवर नोंदवलेल्या सर्व संबंधित तक्रारींवर आवश्यक ती कार्यवाही करून शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन व मदत केली जाईल. या हेल्पलाईनचे उद्घाटनही आज जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले.

सेरेंटिका आपले प्रकल्प उभारताना, तेथील लोकांच्या सोयी सुविधांची काळजी घेत असते. गावांमध्ये नेमकी काय गरज आहे हे शोधून आम्ही तशी त्यांना मदत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत असतो. गेल्या काही महिन्यात आम्ही अशा गरजू लोकांचा शोध घेतला ज्यांना चालण्या फिरण्याचा त्रास आहे. अशा लोकांचे जीवन सहज सोपे व्हावे यासाठी त्यांना व्हीलचेअर द्यावी असा एक संकल्प केला आणि तो संकल्प आज पूर्णत्वास आला आहे. याचा आम्हाला आनंद आहे. गावकर्‍यांच्या सोयी सुविधांसाठी सेरेंटिका नेहमीच प्रयत्नशील राहील असे सेरेन्टिका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण यावेळी म्हणाले. तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली ही हेल्पलाईन प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांमध्ये पारदर्शकता, संवाद आणि विश्वास वाढविण्याचे माध्यम ठरेल. धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी टोल-फ्री क्रमांक १८०० २०२ ८७३५ वर संपर्क साधून आपले प्रश्न, अडचणी किंवा माहिती नोंदविण्याचे आवाहन सेरेन्टिका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण यांनी केले.

Previous Post

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Next Post

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

Related Posts

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026

December 18, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा
अर्थव्यवस्था

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

December 11, 2025
Next Post
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

ताज्या घडामोडी

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!