• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

admin by admin
March 29, 2026
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
0
SHARES
1
VIEWS

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित

धाराशिव

राज्य शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचा देखील सन्मान करण्यात आला.या वेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या कुशल नेतृत्व,दूरदृष्टी आणि परिणामकारक नियोजनामुळे धाराशिव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक गतिमान,पारदर्शक आणि नागरिकाभिमुख केले असून याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.

Follow us on social media:

१५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आल्या.यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड,तुळजाई चॅटबॉट, ‘कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर’ प्रणाली तसेच ‘जीवनरेखा’ प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.डिस्ट्रिक्ट डॅशबोर्डमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले असून निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. ‘कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर’ प्रणालीमुळे शासन निर्णय व परिपत्रकांची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक अचूक आणि जलद झाले आहे.

‘जीवनरेखा’ प्रणालीद्वारे शेत रस्त्यांची नोंद व व्यवस्थापन सुलभ झाले असून ग्रामीण भागातील तक्रारींचे प्रभावी निराकरण होत आहे.तसेच तुळजाई चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असून सेवा वितरण अधिक सुलभ,जलद आणि विश्वासार्ह झाले आहे.ई-ऑफिस प्रणालीच्या व्यापक वापरामुळे ‘पेपरलेस कार्यालय’ संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे.

या यशामागे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नमूद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान,विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याचा वापर प्रशासनात वाढवून कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

Previous Post

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

Related Posts

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
अर्थव्यवस्था

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

December 24, 2025
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
ग्रामीण

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025

ताज्या घडामोडी

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!