धाराशिव
धाराशिव तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गातील सात पदे भरण्यासाठी 20 जुलै ऐवजी 30 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येईल.
तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रिया 2023 चा कालब्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. परंतु सध्य स्थितीत निवडणुकीचे एफ एल सी चे कामकाज चालू असल्यामुळे कोतवाल भरती प्रक्रिया 2023 चा लेखी परीक्षेपासूनचा अंतिम सुधारित कालबध्द कार्यक्रमाची प्रत धाराशिव येथील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या नोटीस बोर्डावर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in प्रसिध्द करण्यात आली आहे.
तरी कोतवाल भरती प्रक्रिया 2023 च्या परीक्षेचा दि.20 जुलै ऐवजी दि.30 जुलै 2023 हा असून त्या दिवशी परीक्षा घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उस्मानाबादचे तहसीलदार तथा तालुका निवड समितीचे सदस्य सचिव डॉ.शिवानंद बिडवे यांनी केले आहे.