धाराशिव – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबेजवळगा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांच्या चर्चेत शिंगोली गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी घेतले जात आहे.
गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामविकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शिक्षणवृद्धी आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला तीन पुरस्कार मिळाले असून, प्रशासनातील अनुभव आणि लोकाभिमुख कामगिरीमुळे त्यांची दावेदारी भक्कम मानली जात आहे.
सौ.योगिता शिंदे या डॉ.पद्मसिंह पाटील यांचे खंदे समर्थक, शिंगोलीचे माजी सरपंच हरिश्चंद्र शामराव शिंदे यांच्या नातसून आहेत. तसेच त्या भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया शिंदे यांच्या पत्नी आहेत. सामाजिक, शैक्षणिक व युवकांसाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे शिंदे दांपत्याचा जनसंपर्क अधिक बळकट झाला आहे. “सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कार्य हाच आमचा ध्यास आहे,” असे सौ. योगिता शिंदे यांनी स्पष्ट केले.
स्थानिकांमध्ये निर्माण झालेला सकारात्मक माहोल पाहता, अंबेजवळगा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










