धाराशिव
परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे २५ व २६ जानेवारी रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.२५ जानेवारी रोजी पालकमंत्री श्री.सरनाईक हे मुंबई येथून सकाळी ११ वाजता खाजगी विमानाने धाराशिवकडे प्रयाण करतील.दुपारी १२.४५ वाजता धाराशिव विमानतळ येथे आगमन व दुपारी १२.४५ वाजता विमानतळ येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण करतील.दुपारी १.१५ वाजता तुळजापूर येथे आगमन.दुपारी २.१५ वाजतापर्यंत आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.दुपारी २.१५ वाजता तुळजापूर येथून धाराशिवकडे प्रयाण करतील.दुपारी २.३० ते ४.४५ वाजतापर्यंत शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी ४.४५ वाजता शासकीय विश्रामगृह शिंगोली येथून एसटी बस आगार धाराशिवकडे प्रयाण. सायंकाळी ५ ते ६ वाजता दरम्यान एसटी बस आगार धाराशिव येथे भेट व आढावा बैठक. सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील.सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत पालकमंत्री कार्यालय येथे शिवसेना व मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी राखीव व सोयीनुसार शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे आगमन व मुक्काम.
रविवार २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह शिंगोली येथून पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय धाराशिवकडे प्रयाण.सकाळी ९.१५ ते ९.५० वाजतापर्यंत प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदना समारंभास उपस्थिती राहतील.सकाळी ९.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित तिरंगा रॅलीच्या स्वागताला उपस्थित राहतील.सकाळी १०.१५ ते दुपारी १२ वाजतापर्यंत जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठक व तुळजापूर देवस्थान विकास आराखड्याच्या सादरीकरणाला उपस्थित राहतील.दुपारी १२ ते १२.३० वाजतापर्यंत पालकमंत्री कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी १२.३० ते २ वाजतापर्यंत पालकमंत्री कार्यालय येथे अभ्यागतासाठी राखीव.दुपारी २.१० वाजता शासकीय विश्रामगृह शिंगोलीकडे प्रयाण व राखीव.दुपारी २.४५ वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव (शिंगोली) येथून धाराशिव विमानतळाकडे प्रयाण.दुपारी ३ वाजता धाराशिव विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.