तेरखेडा
राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रासह ओबीसी प्रवर्गातील ५० टक्याच्या आत आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते , रामदास कदम , नारायण राणे , व छगन भुजबळ यांच्या पुतळ्याची तेरखेडा गावातुन धिंड काढत तसेच जोडे मारत फासावर लटकवले

मराठा आरक्षणाला गावातील सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिला खास करून गावातील मुस्लिम बांधव व तेरखेड्यातील सर्वच फटाका कारखान दार या मध्ये सहभागी होते दिवाळीच्या फटाके खरेदीसाठी लांबून लोक येत आहे तरी सुद्धा मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच फटाका स्टॉल मालकांनी एक दिवस फटाका स्टॉल बंद करून पाठिंबा दिला.
येणाऱ्या काळात आरक्षण नाही दिले तर आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात करू असे सकल मराठा समाजाने सांगितले