एस टी बसवरही दगडफेक
धाराशिव
शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती समोर शारदीय नवरात्री महोत्सवा निमीत्त लावण्यात आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डो.तानाजी सावंत यांच्या बॅनर वरील फोटोला काळे फासण्यात आले आहे.मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस पेटतच चालली असुन वेगवेगळया पध्दतीने आंदोलन करूण आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत.
धाराशिव जिल्हयामध्ये रविवारी विविध आंदोलनं पाहायला मिळाली मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच चिघळत चाललेले दिसत आहे.आज जिल्हयात आनेक ठिकाणी वेगवेळया पध्दतीने आंदोलनं करण्यात आले.एस.टी.बसवर दगडफेक,टॅवर वरती चडून आंदोलन,राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सह आनेक मंत्रयांच्या फोटोचे धण तर काही ठिकाणी जमीनीत गाढुन घेवून ही आंदोलन करण्यात आले.भूम आणि वाशी तालुक्यात एसटी बस वरील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला शाही लावून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला तर धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती समोर शारदीय नवरात्री महोत्सवा निमीत्त लावण्यात आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डो.तानाजी सावंत यांच्या बॅनर वरील फोटोला काळे फासण्यात आले आहे.एकंदरीतच मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस पेटतच चालली असुन वेगवेगळया पध्दतीने आंदोलन करूण आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत.