धाराशिव l सचिन कोरडे
धाराशिव जिल्ह्यातील वाशी हे तालुक्याचे ठिकाण या तालुक्याच्या गावात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावरच गावठी दारूचे दुकाने अगदी थाटामाटात उभी केलेली दिसून येत आहेत.
पोलीस प्रशासनाने व संबंधित उत्पादन शुल्क विभागाने याबाबत डोळ्यात बंद पाकिटाचे अंजन घातले की काय?अशीच चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.
कारण वाशी शहरातील कळंब रोड, एस.आर पंपा समोर, तांदुळवाडी रोडवरील बाजार मैदानात, आणि देवस्थानाचे ठिकाण काशी विश्वनाथ मंदिरासमोर
छुपा मार्गाने नाही तर राजरोसपणे मार्गाने हातभट्टी दारूची सर्रास विक्री होत आहे. तालुक्यात रोजंदारी करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यात दिवसभर अंग मेहनतीचे अधिकचे काम केल्याने थकवा कमी करण्यासाठी म्हणुन हे कामगार दारूचा आधार घेतात.
देशी व विदेशी दारूच्या किमती वाढविल्याने ती खिशाला न परवडणारी असल्याने, विविध प्रकारच्या घातक रसायनांचा वापर करून बनवलेली हातभट्टी दारू मद्यपी हा सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करून केवळ नशेसाठी हातभट्टीची दारू डोळे झाकून पित असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.
हातावर पोट असणारे अनेक लोक अंगमेहनतीची कामे जास्त प्रमाणावर करीत असल्याने बहुतेकांना दारूचे व्यसन जडले. हातभट्टी दारू सहज मिळू लागल्याने व केवळ १० ते २० रूपये ग्लास मिळत असल्याने ही दारू पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. तालुक्यातील बेरोजगार युवापिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे.
दारूमुळे परिसरातील शेकडो मद्यपींना वेगवेगळे आजार जडत आहेत.कुटुंबांमध्ये भांडणे वाढली. मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च होणारा पैसा वाममार्गाला जाऊ लागला. परिणामी, शेकडो कुटुंबातील महिला हैराण झाल्या आहेत.
कारण सर्रासपणे शहराच्या मुख्य मार्गावर तसेच शहरांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी गावठी दारूचे अड्डे, बिनधास्त गुटखा विक्री, गांजा विक्री अशा ह्या बिंदासपणे होणाऱ्या अवैध धंदयावरून पोलीस प्रशासनाच्या कार्यशैली बाबत सर्वसामान्य नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे.