वाशी
वाशी तालुक्यातील सुबोध विद्यालयाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. उज्वल यशाची परंपरा कायम राखत सेमी इंग्रजीचा निकाल देखील शंभर टक्के लागला आहे.यामध्ये विशेष प्राविण्य मिळवत 2 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीमध्ये 16 विद्यार्थी तसेच द्वितीय श्रेणीमध्ये 8 विद्यार्थी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी कुमारी श्वेता अशोक जगदाळे हिने 81.00% गुण मिळवत शाळेमधून पहिला क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक अमीर इन्नूस पठाण याने 79.20% गुण पटकावला तर तृतीय क्रमांक दिक्षा बालाजी शिंदे या विद्यार्थिनीने 74.60% गुण मिळवत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिंदे.डी.डी यांचे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कांतीलालजी (काकाजी) बोराणा तसेच पालकांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत कौतुकाची थाप दिली.