धाराशिव – भारतातील नंबर १ ची असलेली व जागतिक पातळीवर 47 देशात 3 लाख 90 हजार पत्रकार सदस्य असणारी व्हाईस ऑफ मिडीयाच्या बार्शी तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील नारी येथील अस्लम काझी यांची तर उपाध्यक्ष पदी राहूल गुरव, राहूल भालशंकर कार्याध्यक्ष पदी तर मुजमिल कौठळकर खजिनदार पदी तर सुशेन डमरे यांची सचिव पदी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते देण्यात आले.
बार्शी तालुक्यातील छोट्याश्या नारी गावातील अस्लम काझी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून अनेक कामे मार्गी लावली तसेच पत्रकारितेसोबत समाजकार्याची आवड असलेल्या अस्लम काझी यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना देशभरात नावलौकिक असलेल्या व्हाईस ऑफ मिडियाच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक व अभिनंदन केले जात आहे. युवा पत्रकार अस्लम काझी हे गेल्या ३ वर्षांपासून जनता न्यूज या डिजिटल माध्यमा मधून काम करत असून त्यांच्या या निवडीबद्दल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी त्यांचे अभिनंदन केले.