मुंबई
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एस टी महामंडळाचे एमडी शेखर चन्ने आणि सेवा शक्ती संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली असून दिवाळीच्या पुर्वी एस टी कर्माचाऱ्यांना खुश खबर मिळाली आहे.
एसटी कर्माचाऱ्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली होती. त्याचसंदर्भात आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सातवा आयोग किंवा विलनीकरण यासंदर्भात मुख्यमंंत्र्यांसमवेत ३० नोव्हेंबरच्या आत बैठक घेण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून सरसकट ६ हजार रूपये देण्यात येणार आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मंत्रालय येथे मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या मागण्यांची सोडवणूक होणे बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केली. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल असा निर्णय मुख्यमंत्री लवकरच घेतील असे आश्वासन संघटनेस दिले तसेच उद्या संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.